महावितरणची अभय योजना: ३८ लाख वीज ग्राहकांना मोठा दिलासा!

Arjun
0

 

#महावितरण #अभययोजना #वीजबिल #थकबाकी #सवलत #महाराष्ट्र

मुंबई: वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे! 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)ने 'अभय' योजना जाहीर केली आहे. या योजनेतून ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अभय योजनेतील प्रमुख मुद्दे:

  •  थकबाकी माफी: या योजनेतून ग्राहकांना बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १ हजार ७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत.
  •  कोणासाठी: ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे.
  •  काळावधी: या योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ असा आहे.

 सवलती:

  •  हफ्त्यांमध्ये सवलत: मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरण्याची सवलत.
  • एकरकमी सवलत: घरगुती, व्यावसायिक हे लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत आणि उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्क्यांची सवलत.
  •  नवीन कनेक्शन: योजनेनुसार पैसे भरल्यानंतर वीज ग्राहकाला पुन्हा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.

कोण करू शकतो लाभ:

  •  ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिल असलेले सर्व घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक.
  •  भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या क्षेत्रातील ग्राहक.

कसे घ्यावा लाभ:

  • ग्राहकांनी १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधा.

लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण यांच्या मते, या योजनेतून लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

#महावितरण #अभययोजना #वीजबिल #थकबाकी #सवलत #महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

thanks for comment.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!