सावदा पोलिसांची मोठी कारवाई; साळीबाग परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर छापा, १८ जणांना अटक
जळगाव: सावदा शहरात जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील साळीबाग भागातील एका भंगार दुकानाच्या मागील बाजूला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १८ जणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ४५,४०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
नेमकी घटना काय?
सावदा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, साळीबाग भागातील अयुब भंगारवाला याच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या काटेरी झाडाझुडपांच्या आडोशाला काही लोक 'मांग पत्ता' नावाचा जुगार खेळत आहेत. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास खाजगी वाहनांनी जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारींनी तिथून पळ काढला, मात्र पोलिसांनी घेराव घालून १८ जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
या कारवाईत पोलिसांनी खालील १८ जणांना ताब्यात घेतले आहे:
१. मनोज किशोर भालेराव (२७, रा. आंबेडकरनगर)
२. रोहीत चंद्रकांत सन्यास (२५, रा. आंबेडकरनगर)
३. समाधान सिद्धार्थ तायडे (३२, रा. आंबेडकरनगर)
४. करण बाळू साळुंके (३०, रा. आंबेडकरनगर)
५. सागर रवींद्र तायडे (२९, रा. आंबेडकरनगर)
६. संदीप रामदास लोखंडे (२५, रा. आंबेडकरनगर)
७. इरफान रहेमान तडवी (२०, रा. काझीपुरा)
८. सुरेश रामलाल पवार (२५, रा. भोईवाडा)
९. शेख सादीक शेख बशीर (४७, रा. खाजानगर)
१०. नदीम बिसमील्ला बागवान (३२, रा. चांदणीचौक)
११. गोपाळ हरचंद भोई (५९, रा. भोईवाडा)
१२. इमरानखान नसीमखान (३०, रा. खाजानगर)
१३. आमद चादखों तडवी (४८, रा. काझीपुरा)
१४. सचिन केशव तायडे (३२, रा. आंबेडकरनगर)
१५. शेख रिजवान शेख गनी (३०, रा. खाजानगर)
१६. दिलीप रामभाऊ चांदेलकर (५३, रा. भोईवाडा)
१७. प्रविण दगडू गुरव (४०, रा. बुधवारा)
१८. रईस हमीद मोमीन (३५, रा. पठाणवाडी)
जप्त केलेला मुद्देमाल:
पकडण्यात आलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण ३८,४०० रुपये मिळाले आणि जुगाराच्या ठिकाणी ७,००० रुपये रोख व ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण ४५,४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कायदेशीर कारवाई:
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मेहरबान बशीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उमेश अशोक पाटील करत आहेत.
सावदा पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


thanks for comment.