Ganesh visarjan 2024: गणपती बाप्पाचे पाण्यात विसर्जन का करतात ? जाणून घ्या भावना आणि पौराणिक कथा
Ganesh visarjan 2024: अनंत चतुर्थीच्या पावन दिवशी, देशभर गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गणेश विसर्जन हे केवळ एक सण नसून, भावनांचे अतूट नातं सांगणारा एक प्रसंग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की गणेशाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन का केले जाते? यामागे एक पौराणिक कथा आहे.
महाभारताशी असलेले नाते
पौराणिक कथानुसार, श्रीवेद व्यास यांनी गणेश चतुर्थीपासून श्रीगणेशाला महाभारताची कथा सलग 10 दिवस ऐकवली होती. या कालावधीत गणेशाचे तापमान वाढल्याने, वेद व्यासांनी त्यांना तात्काळ जवळच्या तलावात जाऊन थंड पाण्याने स्नान करायला सांगितले. याच कारणामुळे, गणेशाची स्थापना करुन चतुर्थीला मूर्ती पाण्याने थंड केली जाते, असे म्हणतात.
गणेश विसर्जनाचे महत्त्व
गणेश चतुर्थी आणि विसर्जनाचा महिमा अनेक शतकांपासून प्रचलित आहे. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. विसर्जनाला खूप जास्त महत्व आहे. या दिवशी अनंत शुभ फल प्राप्ती केली जाऊ शकते. त्यामुले या दिवसाला अनंत चतुर्थी असे म्हणतात.
गणेश विसर्जन: काय करावे?
- अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जातो.
- गणेश विसर्जनाच्या दिवशी मोदक आणि त्या दिवशी तयार केलेल्या जेवणाचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा.
- गणपतीची मूर्ती संपूर्ण घरातून फिरवावी आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर धान्याच माप ठेवून ते आतल्या बाजूला रित करावं.
- बाप्पाला निरोप दिल्यानंतर ताटावर त्या ठिकाणाची माती किंवा वाळू घरी आणावी.
महत्वाची सूचना: या ठिकाणी दिलेली माहिती पौराणिक कथांवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.
#गणेशचतुर्थी, #गणेशविसर्जन, #अनंतचतुर्थी #Ganesh-visarjan-2024


thanks for comment.